डांभूर्णीत तरुणाला बेदम मारहाण


यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथे भांडण सोडवल्याचा राग आल्याने 22 वर्षीय तरुणाला दोघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. योगेश सुकदेव कोळी (22, रा.डांभुर्णी) यांच्या फिर्यादीवरून, किशन कंडारे व त्याचे वडिल माणिक कंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी रात्री मुकेश कोळी व किशन माणिक कंडारे यांचे भांडण सुरू होते. ते भांडण योगेशने सोडवले. त्याचा राग आल्याने आरोपींनी मारहाण केली. तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !