धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 216 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 58 हजार 535 वर : आतापर्यंत 56 हजार 98 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1371 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 216 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 535 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 371 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी एकाच दिवशी 28 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर जळगाव शहरातील 47 वर्षीय महिलेचा मानस हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला.
रविवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 79
जळगाव ग्रामीण 02
भुसावळ 24
अमळनेर 16
चोपडा 17
पाचोरा 02
भडगाव 00
धरणगाव 03
यावल 02
एरंडोल 03
जामनेर 00
रावेर 02
पारोळा 03
चाळीसगाव 54
मुक्ताईनगर 04
बोदवड 01
अन्य जिल्हा 04

