एलटीटी-कानपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार
भुसावळ : रेल्वे प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 04152 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 मार्च ते 1 मे दरम्यान (9 ट्रीप) दर शनिवारी 4.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी कानपूर सेंट्रल येथे 3.25 वाजता पोहोचेल. 04151 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष कानपूर सेंट्रल येथून 5 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान (9 ट्रीप) दर शुक्रवारी 3.45 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 2.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज आणि फतेहपूर येथे थांबा देण्यात आला आहे.
केवळ आरक्षीत तिकीट असल्यास प्रवास
या गाडीला एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, सात वातानुकुलीत तृतीय श्रेणी, आठ शयनयान आणि सात द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येतील. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड नियमांचे पालन करावे लागणार आहे.

