जिजाऊ निर्माण झाल्यास तरच शिवाजी महाराज निर्माण होतील


जिल्हाध्यक्ष नाना पाटील : भुसावळात शिवजयंती उत्साहात

भुसावळ : आजच्या काळात जिजाऊ होणे फार गरजेचे आहे संस्कार जर योग्य वेळी योग्य वयात मिळाले तरच जिजाऊ घडतील पर्यायाने घराघरात शिवाजी महाराज निर्माण होतील, असे विचार सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी येथे व्यक्त केले. छत्रपती महिला शासन मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोल होते. यावेळी संस्थाध्यक्ष गायत्री पाटील या मुलीने शिव वंदना म्हटली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी राज्य सल्लागार रघुनाथ आप्पा सोनवणे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महिला शासन मंडळ अध्यक्ष गायत्री पाटील, उपाध्यक्ष राजश्री ओगले, सचिव श्रेया पाटील, पूजा चव्हाण, दीक्षा मराठे, आश्लेषा चव्हाण, आरती बाक्ष्ये, रीया पाटील, कांचन लोहार, सेजल खडसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ.अनिता मगर तसेच रीया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिवजयंतीचे औचित्य साधून विविध प्रजातींच्या वृक्ष लावण्यात आले. यशस्वीतेसाठी अर्चना पाटील, डॉ.अनिता मगर, आकाश मगर, मंगला बोरसे, सोनू बोंडे, कांचन लोहर, आदित्य मगर, पिंटू पाटील, भरत जयस्वाल, प्रशांत कुलकर्णी, प्रशांत चौधरी, दत्तु लोहार आदींनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !