फैजपूरात श्री राम मंदिर निधी संकलनाचा श्रीराम पदयात्राद्वारे समारोप
धर्म टिकला तर देश टिकेल : महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज
फैजपूर : त्रिवेणी हनुमान मंदिर ते कष्टभंजनदेव, हनुमान मंदिर सुना सावखेडा अशी श्री राम पदयात्राद्वारे श्री रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पण संकलन समारोप मोठ्या भक्तिभाव जल्लोषात करण्यात आला. श्री रामजन्मभूमी मंदिर निधी समर्पण संकलन अभियानाचे भुसावळ जिल्हा समितीचे अध्यक्ष महामंडलेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या सानिध्यात शनिवार, 20 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच त्रिवेणी हनुमान मंदिर येथे महाराजांच्या शुभ हस्ते हनुमानजींचे विधीवत पूजन व आरती करून श्रीराम पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. ही पदयात्रा मधुकर सहकारी कारखाना, आमोदे बामणोदमार्गे जागृत पुरातन कष्टभंजन हनुमान मंदिर, सुनसावखेडा येथे सकाळी 10 वाजता पोहोचली.
निधी संकलन अभियानाचा समारोप
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी व शास्त्री जगतप्रसाद दासजी यांच्याहस्ते विधीवत पूजन करून महाआरती करून श्रीराम सेवक हनुमान यांच्या चरणी श्रीराम पदयात्रा तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर समर्पण निधी अभियानाचे समापन करण्यात आले. याप्रसंगी अभियानाचे जिल्हाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन म्हणाले की, संपूर्ण देवगिरी प्रांतातील भुसावळ व जळगाव जिल्ह्यात पाच कोटींचा निधी स्वेच्छेने जमा झाला आहे. यामध्ये ऐतिहासिक फैजपूर शहराने 24 लाख 38 हजार 414 रुपये समर्पण निधी जमा केले आहेत. धर्म टिकला तर देश टिकेल. प्रत्येक तरुणाने आपले धर्मकार्य करून राष्ट्राला समर्पित झाले पाहिजे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी श्रीराम वस्तीचे निधी संकलन प्रमुख मिलिंद पाठक व महाराणा प्रताप वर्षीचे निधी संकलन प्रमुख प्रा.राजेंद्र सिंह राजपूत यांनी आपले अनुभव मांडलेत. सूत्रसंचालन पप्पू चौधरी यांनी केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, वैभव वकारे, सुरज गाजरे, संजय सराफ, अक्षय परदेशी, युवराज किरंगे, बाळ आचार्य एकदंत महाराज, अशोक मुखी, गोपी साळी, चंदू वाढे, बबलू महाजन, नितीन पाटील, मधुकर नारखेडे, विनोद परदेशी, रीतेश चौधरी, नीरज झोपे, राहुल भोई, युगंधरा चौधरी, गायत्री महाजन, गायत्री वाक्षे यासह भाविक उपस्थित होते
