सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद


यावल : कोरोना रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी मंदिर हे शासनाच्या पुढील आदेश होईस्तोवर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. बंद काळामध्ये कोणीही मंदिरात दर्शनासाठी अथवा मंदिर परीसरात येऊ नये, असे आवाहन मंदिर विश्वस्तांनी केलेले आहे. अट्रावलचे नवसाला पावणार्‍या मुंजोबाचे मंदिर सुद्धा कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. नागरीकांनी नियम पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आव्हान यावल तहसीलदार महेश पवार, नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी, यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !