सावखेडासीम आरोग्य केंद्रामार्फत कोविडबाबत जनजागृती व स्वॅब तपासणी शिबिर
दहिगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बर्हाटे, डॉ.गौरव भोईटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र दहिगाव, मोहराळा, सातोद व कोळवद येथे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत ग्रामपंचायतीत सभा घेण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. तसेच संशयीत रुग्णांचे आरटीपीसीआर स्वॅब (टेस्ट) घेण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी येथे डॉ.हेमंत बर्हाटे व डॉ.स्वाती कवडीवाले यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांची सभा घेऊन मार्गदर्शन केले.
दहिगाव येथे रुग्णांचे घेतले स्वॅब
दहिगाव येथे डॉ.खालीद शेख, राजेंद्र बारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये सभा घेऊन जनजागृती केली तसेच संशयीत रुग्णांचे स्वॅब घेतले. यावेळी सरपंच अजय अडकमोल, कृउबा संचालक सत्तार तडवी, ग्रामसेवक व्ही.एल.पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या. उपकेंद्र सावखेडासीम, दहिगाव, मोहराळा, सातोद व कोळवद येथे ही ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येऊन 40 संशयीत रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. जनजागृती व शिबिर यशस्वीतेसाठी डॉ.साजीद तडवी, डॉ.खालीद शेख, डॉ. रोशन आरा, डॉ.राहुल गजरे, कल्पेश पाटील, राजेंद्र बारी, बालाजी कोरडे, संजय तडवी, भूषण पाटील, समीर तडवी, अनिता नेहते, महेमुदा तडवी, प्रतिभा चौधरी व आशा सेविका यांनी परीश्रम घेतले.

