धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 368 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 59 हजार 222 वर : एकाच दिवसात 101 रुग्णांची कोरोनावर मात : एकाच दिवसात दोन जणांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे तब्बल 368 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1377 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 59 हजार 222 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 279 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 164
जळगाव ग्रामीण 34
भुसावळ 23
अमळनेर 05
चोपडा 28
पाचोरा 02
भडगाव 02
धरणगाव 02
यावल 00
एरंडोल 06
जामनेर 04
रावेर 07
पारोळा 07
चाळीसगाव 55
मुक्ताईनगर 23
बोदवड 03
अन्य जिल्हा 03

24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यातील 70 वर्षीय पुरूष व चोपडा तालुक्यातील 73 वर्षीय पुरूषाचा डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !