शिक्षक सेना संघटनेतर्फे विविध तालुक्यांच्या अध्यक्षांकडून उज्जैनकर यांचा सत्कार


मुक्ताईनगर : शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांना नुकतीच त्यांच्या गेल्या 22 वर्षात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी एमरीकेने मानद डॉक्टरेट जाहीर केल्याने त्याबद्दल शिवचरण उज्जैनकर यांचा नुकताच शिक्षक सेना संघटनेनेच्या जळगाव, रावेर, यावल, भुसावल, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, चाळीसगाव आदी सन्माननीय तालुकाध्यक्षांनी पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नरेंद्र सपकाळे, नाना पाटील, गुलाबराव पाटील, राकेश साळुंखे, संदीप पाटील, अनिल चौधरी, संदीप पवार, शैलेश शिरसाठ तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संघटक भागवत राठोड, जळगाव जिल्हा सहसचिव नंदलाल भोलाणे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष विनायक वाडेकर, जळगाव तालुकाध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष अनिलकुमार पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !