जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर यावलचा आठवडे बाजार बंद


यावल : जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या आदेशानंतर यावल शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार पुढील बंद ठेवण्यात आला असून त्याबाबत यावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. शुक्रवार आठवडे बाजार परीसरात प्रसिद्ध आहे. या बाजारात तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी याठिकाणी आपला भाज पाला विकायला तसेच ग्रामीण भागातील जनता खरेदीसाठी येतात.

कोविड नियमांची अंमलबजावणी
यावल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला नको म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. जमाव बंदी कायद्यानुसार काही ठिकाणी समारंभात गर्दी आढळून आल्याने नगरपालिका कर्मचारी आणि स्वतः मुख्याधिकारी यांनी या ठिकाणी अचानक पाहणी करून नियम ना पाळल्यामुळे त्यांना पाच हजार रुपये दंड करण्यात आला. त्यानंतर दिवसभर यावल शहरातील रस्त्यांवर विना मास्क फिरणार्‍या पादचार्‍यांना 500 रुपये दंड करण्यात आला असून नागरीकांनी विना मास्क बाहेर न पडण्याचे आवाहनयावल नगरपालिका मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !