कोरोना सुसाट ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 279 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 59 हजार 864 वर : एकाच दिवसात 138 रुग्णांची कोरोनावर मात : एकाच दिवसात दोन जणांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 279 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1381 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 59 हजार 864 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 554 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 122
जळगाव ग्रामीण 09
भुसावळ 04
अमळनेर 02
चोपडा 33
पाचोरा 10
भडगाव 01
धरणगाव 02
यावल 05
एरंडोल 01
जामनेर 18
रावेर 01
पारोळा 02
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 20
बोदवड 09
अन्य जिल्हा 03

24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 46 व 64 वर्षीय रुग्णाचा गणपती हॉस्पीटल व अरुश्री हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !