मांडवेदिगर गावातून तीन हजार 200 रुपयांची दारू जप्त
भुसावळ : तालुक्यातील मांडवादिगर गावातील संशयीत आरोपी मेरचंद फकीरा पवार याच्या ताब्यातून तीन हजार 276 रुपयांची टँगा पंच दारू गुरुवारी दुपारी जप्त करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार विठ्ठल फुसे, नाईक राजेंद्र पवार, रीयाज काझी, राहुल महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

