लाच मागणी प्रकरणी ‘त्या’ पोलिस पाटलाला 28 पर्यंत पोलिस कोठडी
जळगाव : तक्रारदाराच्या भावाविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदारासह आई-वडिलांना गुन्ह्यात आरोपी न करण्यासह तक्रारदाराच्या भावाला जामीन मिळण्यासाठी 40 हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15 हजार रुपये निश्चित केल्यानंतर तातडीने लाचेची दहा हजारांची रक्कम आणून देण्याची मागणी 13 फेबु्रवारी रोजी केल्यानंतर पारोळा पोलिस ठाण्यातील हवालदार रवींद्र त्र्यंबक रावते (रा.किसान कॉलेजसमोर, पारोळा) व मंगळूर पोलिस पाटील प्रल्हाद पुंडलिक पाटील (रा.मंगरूळ, ता.पारोळा) यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीबाबत एसीबीला अहवाल आल्यानंतर जळगाव एसीबीच्या पथकाने आरोपी प्रल्हाद पाटील यास गुरुवारी रात्री उशिरा अटक केली होती. आरोपीला शुक्रवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यास 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयीत हवालदार रवींद्र त्र्यंबक रावते (रा.किसान कॉलेजसमोर, पारोळा) यांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हे देखील वाचा : पाचोर्यातील लाचखोर प्रभारी सहाय्यक दुय्यम निबंधकाला एक दिवसाची कोठडी

