नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रम


आमदार चंद्रकांत पाटील : कुर्‍हाहरदो येथे जि.प.शाळेच्या वर्गखोलीचे बांधकामाचे भूमिपूजन

बोदवड : एखाद्या कुटूंबाला त्यांच्या हक्काची जागा व घर मिळत असेल तर ते तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. यासाठी शासन आपल्या दारी याप्रमाणे ‘आमदार आपल्या दारी’ या नावाचा उपक्रम राबवित आहे. त्यात ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार जागेवर हजर असतील. नागरीकांनी प्रस्ताव सादर करून लागलीच त्यांचे प्रकरण मार्गी लागण्यासाठी प्रयत्न होतील, असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. तालुक्यातील कुर्‍हा हरदो येथे जि.प.शाळेच्या नवीन वर्ग खोली बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

आमदारांनी शब्द केला खरा
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधी अंतर्गत 8.42 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले शिवाय तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात शाळेच्या भिंतेच्या कुंपणाच्या उद्घाटनप्रसंगी आमदारांनी शाळेच्या वर्गखोलीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देत तो खरा करून दाखवला.


बचत गटांच्या महिलांना आश्‍वासन
कुर्‍हा हरदो गावात 40 गट असून यात चारशे महिला आहेत परंतु त्यांना बसायला सुसज्ज ठिकाण नसल्याची तक्रार महिलांनी केल्यानंतर जुन्या जागेची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यासंदर्भात तातडीने पत्र देऊन प्रश्न सोडवितो, असशी आमदारांनी यावेळी दिली.

समस्या सोडवण्याची जवाबदारी लोकप्रतिनिधींची
प्रत्येक गावात फिल्टर प्लांट देण्याची माझी जबाबदारी आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री असून मुक्ताईनगर मतदारसंघातील नागरीरकांना शुद्ध व मुबलक पाणी कसे द्यायचे हा आपला प्रयत्न असणार असून तालुक्यात शेत पाणंद रस्ते नाहीत, गावात सार्वजनिक शौचालये सुस्थितीत नाही, गटारी नाहीत ते माझ्या 2515 या निधीतून सोडवण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी आमदार म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील. गटविकास अधिकारी संतोष नागटीळक, विस्तार अधिकारी आर.बी.सपकाळे, तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहरप्रमुख संजय महाजन, ईश्वर जंगले, सागर पाटील, दीपक माळी, सरपंच मिराबाई म्हस्के, सदस्य संजय शूरपाटणे, उपसरपंंच मुकुंदा शेळके, मुख्याध्यापक कोठाळे, बचत गट प्रमुख लिलाबाई नायसे, भगवान महाले, सुभाष देवकर, नईम खान यांच्यासमवेत ग्रामस्थ उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !