भुसावळात दोन किलो गांजासह युवक जाळ्यात


भुसावळ : शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन किलो ओला गांजा बाळगून असलेल्या युवकास शुक्रवारी पहाटे अटक केली आहे. राकेश भीमराव नटकर (रा.सतारा, ओकारेश्वर मंदीराजवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या हाताला काम नसल्याने त्याने रीस्क स्वीकारत सुरतमध्ये हा गांजा नेत असल्याचे सांगितले. आरोपीने नेमका हा गांजा कुठून व कोणाकडून खरेदी केला? याची चौकशी पोलिस करीत आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे व भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, जितेंद्र सोनवणे, साहील तडवी, संजय बडगुजर यांनी ही कारवाई केली. जितेंद्र सोनवणे यांनी फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहा.पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी पुढील तपास करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !