धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 288 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा 60 हजार 470 वर : आतापर्यंत 56 हजार 845 रुग्णांची कोरोनावर मात तर आतापर्यंत 1384 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे तब्बल 288 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार 470 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 845 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 384 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी एकाच दिवशी 156 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात एका रुग्णांचा मृत्यू ओढवला.
शनिवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे

जळगाव शहर 139
जळगाव ग्रामीण 08
भुसावळ 14
अमळनेर 08
चोपडा 15
पाचोरा 13
भडगाव 11
धरणगाव 03
यावल 05
एरंडोल 22
जामनेर 15
रावेर 02
पारोळा 04
चाळीसगाव 17
मुक्ताईनगर 08
बोदवड 02
अन्य जिल्हा 02
24 तासात एका रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात चोपडा तालुक्यातील 56 वर्षीय पुरुषाचा मानस रुग्णालयात मृत्यू झाला.
