भाजपा कायदे आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अॅड.ए.जी.जंजाळे
वरणगाव : भारतीय जनता पार्टी कायदे आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वरणगावचे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते अॅड.ए.जी.जंजाळे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अॅड.प्रकाशराव पाटील यांनी केली आहे. माजी मंत्री गिरीष हाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
अॅड.जंजाळे यांच्या निवडीनंतर माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, प्रदेश मंत्री खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी अभिनंदन केले. निवडीप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, गोलू राणे, मिलिंद भैसे, गजानन वंजारी, हितेश चौधरी, पप्पू ठाकरे, राहुल जंजाळे, किरण वंजारी विक्की चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

