मुलाने वडिलांना खावटी द्यावी : न्यायालयाचे आदेश
बोदवड : तालुक्यातील शेलवड येथील वडीलांना घराबाहेर काढणार्या मुलास बोदवड न्यायालयाने चपराक दिली असून न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या मुलास वडीलांना दरमहा दोन हजार रुपये खावटी द्यावी लागणार आहे. शेलवड येथील चिंधू सुरळकर या ज्येष्ठ नागरीकास मुलाने घराबाहेर काढले होते. या प्रकरणी चिंधू सुरळकर यांनी मुलगा संजय चिंधू सुरळकर याच्याविरुध्द बोदवड तालुका न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणात बोदवड येथील न्यायालयाने नुकताच हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

