मुंबई ते गोरखपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने मुंबई व गोरखपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या मुंबईसह गोरखदरम्यान धावणार
01081 साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 3 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी 4.40 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी गोरखपूरला दोन वाजता पोहोचेल. 01082 साप्ताहिक विशेष गाडी गोरखपूर येथून 5 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शुक्रवारी 4.05 वाजता सुटल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसर्‍या दिवशी 11.45 वाजता येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी (केवळ 01082 साठी), पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिओकी, मिर्जापूर, वाराणसी, औनिहर, मऊ, भटनी आणि देवरीया स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, 12 शयनयान, तीन द्वितीय आसन श्रेणी बोगी जोडण्यात येतील. पूर्णपणे आरक्षित असलेल्या 01081 विशेष गाडीचे बुकिंग सामान्य भाडे दराने 28 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे व संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी मिळेल शिवाय प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !