सावद्यात शहर शिवसेनेचे आंदोलन म्हणजे जनतेत गैरसमज पसरविण्याचा प्रकार
नगराध्यक्षा अनिता येवले यांचा लेखी पत्राद्वारे केला दावा
सावदा : सावदा नगरपालिकेत सोमवार, 1 मार्च रोजी सावदा शहर शिवसेने तर्फे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे खुर्चीस हार घालून आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात नगराध्यक्षा अनिता येवले यांनी सेनेचे आंदोलन म्हणजे जनतेत गैरसमज पसरविण्याचा प्रकार असल्याचा दावा एका लेखी पत्राद्वारे केला आहे.
सत्ताधार्यांविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
या लेखी खुलाश्यात त्यांनी शहरात विकासकामे होत असून त्यात भेदभाव होत नसल्याचे सांगत शिवसेनेकडून आलेल्या कामांना यापूर्वी नाहरकत दिल्याचे नमूद केले आहे. नगरपरीषदेसमोरील पाण्याची टाकी, सुगंगा नगरातील रस्ते यासाठी अगोदरच नाहरकत देण्यात आली आहे. शादीखाना हॉलसाठी अर्ज आला असून त्यासाठी लवकरच मीटिंग घेणार होतो व त्यासाठी सदस्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी वेळ घेतली होती व लवकरच सभा लावून निर्णय घेऊ असे सांगितले होते तर खंडेराव वाडी मंदिर निधीबाबत माझ्याकडे अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही ती आल्यावर याबाबत निर्णय घेऊ. या विषयाबाबत कोणत्याही आलेल्या निधीबाबत अद्यापपर्यंत दिरंगाई झालेली नाही आणि होणार नाही. शहर शिवसेनेतर्फे माझे कार्यकाळात जे निवेदन आले ती स्वीकारून त्याचा सकारात्मक विचार केला असून प्रश्न मार्गी लावलेले आहेत तथापी अचानक विषयाबाबत आधी निवेदन न देता सरळ नगरपरीरषद कार्यलयात येऊन खुर्चीस हार घालणे व आंदोलन करणे चुकीचे असून हा माझे व सत्ताधारी विषयी जनतेत गैरसमज पसरविण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे,

