वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम महिलादिनी सुरू न झाल्यास जनआंदोलन
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचा परखड इशारा
वरणगाव : वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम महिलादिनी 8 मार्च रोजी सुरू न झाल्यास महिला मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडतील, असा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला आहे.
योजनेच्या कामाबाबत 22 जानेवारी 2021 रोजी वर्क ऑर्डर देण्यात आल्यानंतरही महिनाभराच्या विलंबनानेही काम सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. झारीतील नेमके कोणते शुक्राचार्य योजनेच्या कामात अडथळे आणत आहेत? असा सवालही काळे यांनी केला आहे.
योजना पूर्णत्वास आल्यास शहरवासीयांना 24 तास पाणी
जिल्हाधिकार्यांनी 22 जानेवारी रोजी योजनेबाबत वर्क ऑर्डर दिली असून सव्वा महिन्यानंतरही योजनेच्या कामाला सुरूवात झालेली नाही. वरणगाव शहरात आठ आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून योजना पूर्णत्वास आल्यास 24 तास पाण्याची सोय होणार आहे. वरणगावकरांच्या तोंडाचे पाणी जाणीवपूर्वक लांबविण्याचे महापाप झारीतील शुक्राचार्य करीत असून केवळ विकासात अडथळे आणणे हे योग्य नाही. प्रशासक मुख्यधिकारी वेळ देत नाही, अनेक कामे पेंडींग असून तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या सुद्धा पावणे तीन कोटींच्या कामाला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही. वरणगावकरासाठी ज्या पोट तिडकीने पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली ती पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही काळे म्हणाले.

आता नाही हटणार मागे : सुनील काळे
वरणगावकरांना जो पर्यंत 24 तास पाणीपुरवठा होत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नसल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपाध्यक्ष सुनील माळी, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी, गोलू राणे, कुंदन माळी, संदीप भोई, अॅड.ए.जी.जंजाळेख, अल्लाउद्दीन सेठ, शामराव धनगर, हितेश चौधरी आदींनी दिला आहे.
