गृहमंत्री म्हणाले, जळगावच्या ‘आशादीप’ वस्तीगृहात तो प्रकार घडलाच नाही !
मुंबई : जळगावातील आशादीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरण विधी मंडळात गाजल्यानंतर गृहमंत्र्यांनी उच्चस्तरीय समितीचे गठण केले होते. गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावातील वस्तीगृहाबाबत होत असलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत तशी घटना घडली नसल्याचे सांगितले. आरोपांच्या अनुषंगाने आयएएस अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील समितीने बुधवारी सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, त्या वसतीगृहात काही दिवसांपूर्वी काही महिला गाणी म्हणत होत्या मात्र यात आरोप करण्यात येत असलेला प्रकार झालाच नाही. यामुळे हे प्रकरण कपोलकल्पीत असल्याचे गृहमंत्री म्हणाले. या प्रकरणी अफवा पसरवणार्यांवर कारवाई होईल असेही गृहमंत्री म्हणाले.
हे देखील वाचा : आशादीप वस्तीगृहाबाबत आरोप करणारी महिला मनोरुग्ण : पालकमंत्री गुलाबराव पाटील

