आशादीप वस्तीगृहाबाबत आरोप करणारी महिला मनोरुग्ण : पालकमंत्री गुलाबराव पाटील


मुंबई : जळगावच्या आशादीप वसतीगृहाबाबत आरोप करणारी ती महिला मनोविकृत असून संबंधीत वस्तीगृहात असले कोणतेही प्रकरण घडलेच नसल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील या प्रकरणी सभागृहात निवेदन दिले. ना. पाटील म्हणाले की, आशादीप वसतीगृहातील कथित घटना ही एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर खळबळ उडाली.

हे देखील वाचा : गृहमंत्री म्हणाले, जळगावच्या ‘आशादीप’ वस्तीगृहात तो प्रकार घडलाच नाही !


जिल्ह्याच्या बदनामीचे दुःख
पालकमंत्री म्हणाले की, मी स्वत: जळगावचा पालकमंत्री असल्यामुळे या माध्यमातून आमच्या जिल्ह्याचे नाव चुकीच्या माध्यमातून जगासमोर गेल्याने वाईट वाटले. जळगावातील आशादीप महिला वसतीगृहातील कथित व्हिडीओ प्रकरणाने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच उच्चस्तरीय समितीचे गठण करून चौकशी करून दोन दिवसात अहवाल मांडण्यात येईल असे जाहीर केले होते. यानुसार त्यांनी गुरुवारी चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी उच्च अधिकार्‍यांच्या समितीद्वारे चौकशी केली असता हे प्रकरण घडलेच नसल्याचे समोर आले. या प्रकरणी ज्या महिलेने आरोप केले तिच्याविरूध्द 17 वेळेस तक्रारी करण्यात आल्या आहेत. ती मनोरूग्ण असल्याचे आधीच समोर आले असून तिने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !