धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात 548 कोरोना रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 62 हजार 650 वर : एकाच दिवसात 245 रुग्णांची कोरोनावर मात
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 548 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1396 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 62 हजार 650 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 57 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर गुरूवारी एकाच दिवसात 245 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
गुरूवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 248
जळगाव ग्रामीण 06
भुसावळ 46
अमळनेर 02
चोपडा 83
पाचोरा 01
भडगाव 00
धरणगाव 08
यावल 00
एरंडोल 03
जामनेर 45
रावेर 24
पारोळा 17
चाळीसगाव 45
मुक्ताईनगर 18
बोदवड 02
अन्य जिल्हा 02

