भुसावळात महिलेवर अत्याचार : गुन्ह्यातील दुचाकीसह कपडे जप्त


भुसावळ : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिलेवर गत महिन्यात सोमवारी रात्री भावेश कांतीलाल दंडगव्हाळ (28, शिव कॉलनी, रेल्वे दुनिया परीसर, भुसावळ) या आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. कुठलाही सबळ पुरावा नसताना केवळ पीडीतेने सांगितलेले लाल रंगाच्या दुचाकीचे वर्णन व पीडीतेने सांगितल्यानंतर आरोपीचे बनवलेले स्केच या आधारे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. आरोपीला शुक्रवार, 26 फेब्रुवारी रोजी अटक करणयात आली होती. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिल्यानंतर पोलिसांनी ओळख परेडसाठी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर ती न्यायालयाने मान्य केली. पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान आरोपीची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व कपडे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.अधीक्षक अर्चित चांडक व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !