रावेर तालुक्यात 71 हजार रेशन कार्ड सर्वेक्षणाला सुरुवात


लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरदारांचे रेशनकार्ड होणार रद्द

रावेर : रावेर तालुक्यात 71 हजार रेशन कार्ड सर्वेक्षणाला सुरुवात रावेर तालुक्यात पुरवठा विभागातर्फे रेशनकार्ड शोध मोहिम राबविण्यास सुरुवात झाली असून ज्यांचे उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त असून जे शासनाकडून मिळणार्‍या धान्याचा लाभ घेतात अशांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. यासाठी पुरवठा विभागातर्फे तालुकाभरात सुमारे 71 हजार रेशन कार्डच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

लाखावर उत्पन्न असणार्‍यांचे कार्ड होणार रद्द
शासनामार्फत वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असलेल्या शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. या मोहिमेत प्रत्येक रेशन कार्डाची तपासणी करण्यांत येणार आहे. कार्ड धारकाकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेतला जाणार आहे. या अर्जासोबत संबंधित कार्डधारकाला एका वर्षाच्या आतील रहिवास पुरावा, अधार कार्ड , गॅस असल्यास पुस्तक, बँक पासबुकची प्रत जोडावी लागणार आहे.


पुरावा नसलेल्या रेशन कार्डची पुन्हा तपासणी
रेशन कार्ड लाभार्थीकडून सर्वेक्षणाचे अर्ज भरल्यानंतर त्यांची छाननी होणार आहे. आवश्यक पुरावा नसलेल्या रेशन कार्डधारकांचा समावेश ‘ब; गटात होईल व नंतर ‘ब’ गटातील सर्व रेशनकार्डची पुन्हा तपासणी करून योग्य पुरावे नसल्यास रद्द केले जाणार आहे.

शिल्लक धान्य गरीब, निराधार कुटुंबाना मिळणार
रावेर तालुक्यात 71 हजार 303 विविध योजनेतील रेशन कार्ड धारक असून ज्यांची आर्थिकस्थिती चांगली आहे, नोकरी किंवा शेती असेल तर त्यांनी स्वता:हुन रेशन कार्डावरील धान्य बंद करून घ्यावे किंवा आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून ते बंद होईल व शिल्लक धान्य आम्ही तालुक्यातील गरीब, निराधार कुटुंबाना देणार आहे. माझा हेतु खर्‍या आणि गरजु लाभार्थापर्यंत शासनाचे धान्य पोहचावे हा असल्याचे मत येथील पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांनी ‘जनशक्ती’शी बोलतांना स्पष्ट केले.

149 रेशन दुकानांवर मिळणार फॉर्म
रावेर तालुक्यातील 149 रेशन दुकानांवर पुरवठा विभाग रेशन कार्ड सर्वेक्षणाचे फॉर्म उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर रेशन दुकान चालक हा फॉर्म संबधित लाभार्थीकडे शेती व नोकरी तसेच एक लाखांपेक्षा अधिक उपन्न नसल्याची पडताळणी करून फॉर्म भरून घेतला जाणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !