चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील शोपियांच्या मनिहाल गावात चार दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवादी लश्कर ए तोयबा या संघटनेशी निगडीत असल्याचे सांगण्यात आले. ही संयुक्त मोहीम भारतीय सेनेच्या 34 आरआर, पोलिस आणि सीआरपीएफने मिळून यशस्वी केली. या मोहिमेत जवानांनी एके-47 रायफलसह तीन पिस्तूलं देखील हस्तगत केली. दरम्यान, मागील आठवड्यातच शोपियांमधील रावलपोरा येथे जवानांनी चकमकीत जैशचा कमांडर सज्जाद अफगानी याला ठार केलं होते. अफगानीजवळ आढळून आलेल्या चिनी बनावटीची 36 काडतूसांनी जवानांना अधिकच सतर्क केले आहेत. यानंतर जवानांनी आपली वाहनं, बंकर्स आणि बुलेटप्रुफ संरक्षण अधिकच मजबूत केलं आहे. स्टीलची ही काडतूसं सामान्य बुलेटप्रुफ वाहनांना आणि जवानांच्या बुलेटप्रुफ जॅकेटला भेदण्याची क्षमता ठेवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !