काळाची गरज ओळखून केलेले काम अभिमानास्पदच


पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे : भुसावळात जय गणेश कोविड सेंटरचा शुभारंभ

भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, पैशांअभावी गोरगरीबांना उपचार मिळत नसतांना जय गणेश कोविड सेंटरची उभारणी हा अभिमानास्पद उपक्रम असून मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी येथे केले. शहरातील जय गणेश फाऊंडेशन कोविड केअर सेंटर, म्युनीसीपल हायस्कूलमध्ये सुरू करण्यात आलेल्या जय गणेश कोविड सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

यांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमा सोशल डिस्टन्स राखत भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, जिल्हा व्यापारी संघ अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, रोटरी माजी प्रांतपाल राजीव शर्मा, जय गणेश फाऊंडेशन चे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे उपस्थित होते.

सर्वोतोपरी सहकार्य करणार : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी संदीप चिद्रावर यांनी संस्थेचे कौतुक करून समाजाला गरज असतांना कोविड सेंटरची उभारणी झाल्याचे सांगून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

समाजाने पुढे येण्याची गरज : उमेश नेमाडे
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी गोरगरीब जनतेला सेवा देण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे सांगून होम क्वारंटाइर्नच्या नावाखाली शहरात फिरून कोरोना संक्रमण करण्यापेक्षा कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन कोरोना मुक्त होण्याची गरज असल्याचे सांगितले. जय गणेश कोविडसेंटरमध्ये डॉ.निखील पाटील हे वैद्यकीय सेवा देणार आहेत, त्यांना डॉ.अभय कोटेचा आणि पूर्वा नेमाडे हे साहाय्य करणार आहेत.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे, विद्यमान अध्यक्ष धिरज धांडे, सचिव तुषार झांबरे, रोटरी रॉयल्सचे सचिव राजेंद्र यावलकर, स्पोर्ट्स क्लब कार्याध्यक्ष चैत्राम पवार, फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष प्रविण पाटील, स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष निलेश कोलते, नीळकंठ पाटील, अतुल भारंबे, अनुपसिंग ठाकूर, रवी पाटील, रोटेरीयन महेश फालक, शरद लोहार, शुभम नेमाडे, हर्षल वानखेडे, सुमित यावलकर, विशाल आहुजा, रो.विनोद तायडे, रो.धीरज मुळे, देवेंद्र राजपूत आदी पदाधिकारी परीश्रम घेत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !