भुसावळात आज महारक्तदान शिबिराचे आयोजन
भुसावळ : राज्यात रक्ताचा वाढत असलेला तुडवडा पाहता सामाजिक भावनेतून महाराणा प्रताप राजपूत समाज संघर्ष समिती भुसावळ तर्फे 9मे रोजीच्या हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीचे औचित्य साधून रविवार, 2 रोजी सकाळी 10 वाजता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरात सहभागाचे आवाहन
जामनेर रोड, आनंद नगर, धन्वंतरी ब्लड बँकेत रविवारी सकाळी 10 ते 12 दरम्यान होणार्या शिबिरात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीणसिंह पाटील, संजयसिंग चौहान, अभिजीत पाटील, अमोल पाटील, बी.एन.पाटील, यशवंत चौधरी, श्याम गोविंदा, सोनी ठाकूर, सुरेंद्रसिंग पाटील, चंदूसिंग चव्हाण, दामोदर राजपूत, हर्षल पाटील, गोपी राजपूत, सुरतसिंग पाटील, सुनील चौधरी आणि समस्त राजपुत समाजबांधवांनी केले आहे.



