चंद्रकांतदादांनी भुजबळांना सुनावले : जामिनावर आल्याने जास्त बोलू नका !
मुंबई : बंगालच्या निकालावरुन भाजपवर मंत्री छगन भुजबळ यांनी टिका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही भुजबळांना सणसणीत उत्तर देत तुम्ही जामिनावर सुटला असल्याचे सांगत तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, हे बरोबर नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

