पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयातून तरूणाला बेदम मारहाण
जळगाव : जुना वाद आणि पोलिसांना माहिती देतो या संशयावरून तरूणाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवार 30 एप्रिल रोजी रात्री पिंप्राळा येथील मढी-चौकात घडली. रामानंद नगर पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा
अमोल सुकलाल भाई (24, रा. मढी चौक, पिंप्राळा) आई-वडीलांसह राहतो. जुन्या वादातून सचिन चव्हाण रा. शंकर अप्पा नगर, विशाला भिका कोळी आणि बाबुलाल धोबी (रा.कोळी वाडा) यांनी 30 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता अमोलच्या घरी येवून शिवीगाळ व बेदम मारहाण केली. आमच्या बद्दल पोलिसांकडे जावून बातम्या देतो या संशयावरून या तिघांना मारहाण केली. तसेच अमोलच्या आईवडीलांना धमकी देत अमोलला आवरा नाहीतर हातपाय मोडून भिक मागायला लाविन अशी धमकी दिली. अमोल भोई यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सतीश डोलारे करीत आहे.



