रेड मर्क्युरीचे देण्याच्या बहाण्याने पंजाबच्या युवकाचे अपहरण
रेड मर्क्युरीचे दच्या बहाण्याने पंजाबच्या युवकाचे अपहरण
मुक्ताईनगर : रेड मर्क्युरीचे आमिष दाखवत तालुक्यातील चारठाणा येथील चौघांनी पंजाब येथील एकाचे अपहरण केले परंतु पोलिसांनी सदर अपहृत व्यक्तीची तात्काळ सुटका केल्याची नुकतीच घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
पंजाबमधील रामनगर कलनी गुरुनानकपुरा, अमृतसर येथील रोहित बलवीर सिंग शर्मा (36) याने मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 29 एप्रिल 20 21 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास (वाहन क्रमांक एम.एच.04 एक्स 6733) या महिंद्रा कंपनीच्या गाडीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथील नीरज पवार याने मी तुम्हाला रेड मर्क्युरी देतो, असे आमिष दाखवले आणि वाहनांमध्ये बसण्याचे सांगितले व चारठाणा शिवारात आणले. या ठिकाणी त्याचे दोरीने हात पाय बांधले व त्याला तीन लाख रुपयांची मागणी केली. अपहृत व्यक्तीने पंजाब येथील त्याचा मित्र संजय कुमार यास व्हाट्सअप व्हिडिओ कॉल केला व त्याचे अपहरण करून त्याला एका ठिकाणी बांधून ठेवले असल्याचे सांगितले. संजय कुमार याने बुलढाणा-मलकापूर व जळगाव येथील पोलिसांशी संपर्क साधला व सर्व हकीकत सांगितली. ही माहिती मिळताच बरोबर पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक तत्कालीन रामकृष्ण पवार, पीएसआय निलेश सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शेजोळे, एनपी सी गजमल पाटील, संतोष नागरे, मुकेश घुगे, देवसिंग तायडे, दिलीप पाटील कांतीलाल केदारे, अशोक जाधव, चालक सुरेश पाटील, नितीन चौधरी, सतीश सावे तसेच होमगार्ड पथक यांनी शिताफीने चारठाणा शिवारात जाऊन त्या ठिकाणी अपहृत केलेल्या रोहित बलवीर सिंग शर्मा या इसमाची सुटका केली. आरोपी नितेश विजय चव्हाण यास अटक केली. दरम्यान रोहित शर्मा यांच्या फिर्यादीवरून प्रेम कुमार , नीरज ऊपेन पवार , राजेश्वर पवार तसेच नितेश विजय चव्हाण अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर शेजोळे हे करीत आहेत.



