रावेरात ऑक्सिजन सिलेंडर लोकार्पणाचे गोंधळात उद्घाटन


आधी निधी लोकार्पणाचला भाजपा युवा मोर्चाचा होता विरोध मात्र राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी निधी दिल्याचे सांगताच उद्घाटन

रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले ड्यूरो ऑक्सिजन सिलेंडरचे लोकार्पण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. लोकवर्गणीतुन ड्यूरो सिलेंडर बसवण्यात आल्यानंतर आमदार साहेब आपण याचे लोकार्पण करू नका, तुम्ही येथे कोणताच निधी दिला नाही असे म्हणत भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तथा सरपंच महेंद्र पाटील यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या लोकार्पण कार्यक्रमावरच आक्षेप घेतल्यामुळे काही काळ येथे गोंधळ उडाला होता. यानंतर आमदार चौधरी लोकार्पण न करताच निघून जात असतांना राष्ट्रवादीचे सुनील कोंडे यांनी ड्यूरोच्या लोकवर्गणीत आम्ही सुध्दा निधी दिला असल्याचे सांगत आरोपाला उत्तर देत गोंधळामध्येच आमदार शिरीष चौधरींच्या हस्ते लोकार्पण करून घेतल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.

रुग्णांना दहा तास ऑक्सीजन मिळण्याची सोय
सिलेंडरच्या माध्यमातुन 40 कोरोना रुग्णांना सुमारे दहा तास ऑक्सिजन मिळण्याची सोय होणार आहे. रावेर ग्रामीण रग्णालयात लोकवर्गणीतुन सुमारे सहा लाख रुपये खर्च करून ड्यूरो सिलेंडर बसविण्यात आले आहे. गुरुवारपासून या ड्यूरो सिलेंडरमधून कोरोना बाधितांना ऑक्सिजन मिळणार आहे त्यामुळे रावेर तालुक्यातील रुग्णांची ऑक्सिजनसाठीची धावपळ थांबणार आहे. त्याचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले आहे. या प्रणालीसाठी लोकवर्गणी करण्यात आल्याने रोख व चेक स्वरूपात रक्कम जमा झाल्यानंतर सहा लाखातून ड्यूरो सिलेंडर बसविण्यात आले तर उर्वरीत रक्कम तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे सुरक्षित आहे.




यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तसीलदार उषाराणी देवगुणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रणित महाजन, महेंद्र पाटील, महेश लोखंडे, विलास ताठे ,डॉ.सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

आरोग्यासाठी एक कोटीचे कामे प्रस्तावीत : आमदार चौधरी
रावेर ग्रामीण रग्णालयात केलेला गोंधळ काहीच उपयोगाचा नाही. कोरोना काळात राजकारण करू नका ड्यूरो सिलेंडर बसविण्याची मागणी मी सुध्दा आमदार निधीतुन मंजूर केली होती. आरोग्यासाठी रावेर व यावलसाठी माझ्या निधीतुन सुमारे एक कोटी प्रस्तावित केले आहे. यामध्ये दोन 40 लाखांच्या रुग्णवाहिका रावेर, यावल, फैजपूर पालिकेला अँटीजन टेस्टसाठी प्रत्येकी 10 लाखांचा निधीची देणार आहे तसेच यावल-न्हावी व रावेर ग्रामीण रुग्णालयांच्या औषधांसाठी प्रत्येकी 12 लाखाचे औषध मंजूर करून घेतल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !