भुसावळात मास्क न घातलेल्या रेल्वे प्रवाशांवर दंडात्मक कारवाई


भुसावळ : भुसावह रेल्वे विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने मास्क न घातलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी दंडात्मक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून 19 एप्रिल ते 4 मे दरम्यान 863 रेल्वे प्रवाश्यांना दंड आकारण्यात असून एक लाख 22 हजार 600 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. प्रवाशांना दंड पावतीसोबत फेस मास्कदेखील विनाशुल्क देण्यात आला. कोरोना साथीच्या आजारामुळे सद्य परीस्थितीशी सामना करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून भुसावळ विभागाने रेल्वे प्रवाशांना स्टेशन परीसर आणि रेल्वे प्रवासादरम्यान फेस मास्क घालावा तसेच स्टेशन परीसर आणि गाड्यांमध्ये थुंकू नये, स्वच्छता करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !