ओल्या दुष्काळाबाबत प्राप्त निधीची माहिती देण्यास टाळाटाळ


रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामातील ओल्या दुष्काळसंदर्भात आलेल्या नुकसान भरपाईची माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. रावेर तालुक्यात 2019 मध्ये प्रचंड ओला दुष्काळ पडला होता. त्यावेळी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून रक्कम आली होते. या संदर्भात माहिती देण्यास महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ होत आहे. जाणून-बुजुन वेळ मारून नेली जात आहे. माहिती न देण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. शासनाकडून आलेल्या मदत निधीची माहिती का देण्यास टाळाटाळ का होत आहे? असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शेतकर्‍यांवर नेहमीच पडतेय सुलतानी संकट
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जातेय.कधी अतिवृष्टी तर कधी पावसामुळे या भागात नेहमी नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई म्हणून शासन निधी देतो परंतु या संदर्भाची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने या संदर्भात दखल घेण्याची अपेक्षा आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !