वरणगावात रेडिमेड दुकानाला आग : सहा लाखांचे कपडे जडून खाक
वरणगाव : शहरातील मुख्य रोडवरील सुरेश ड्रेसेस या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला अचानक इलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होवू आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या रेडिमेट कड्यांसह फर्निचर जळून खाक झाल्याने सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
सुदैवाने टळली जीवीतहानी
शहरात सुरेश ड्रेसेस हे सुरेश सरोदे (रेल्वे स्टेशन रोडवर, आनंद सायकल, मार्ट शेजारी, वरणगाव) यांचे रेडिमेड कपडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किट होवून आग लागली व पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील फर्निचर व रेडिमेड कपडे जळाल्याने सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याने नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. आगीवर नगरपरीषदेच्या अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. संदीप राजाराम सरोदे यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक सुनील वाणी, हवालदार मनोहर पाटील, मजहर पठाण करीत आहेत.



