कोविड रुग्णांना देशात कुठेही घेता यावा उपचार


शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी यांच्याकडे मागणी

भुसावळ : सध्या भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृत्यू दराचे प्रमाण देखील वाढत आहे. कोरोनाबाधीत रुग्ण अंतिम टप्यात अपुर्‍या ऑक्सिजनमुळे बेड उपलब्ध होत नसल्याने गंभीर अवस्थेत दाखल होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत असल्यामुळे अपुरे बेड, अपुर्‍या ऑक्सिजन अभावी जीव वाचवण्यासाठी आपापल्या राज्यांच्या शेजारील जवळील राज्यांमध्ये कोरोनाबाधीत रुग्ण जीव वाचविण्यासाठी कोविड उपचारांसाठी दाखल होत आहेत मात्र जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना मध्य प्रदेशातील काही रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बंदी करण्यात आली आहे.परीणाम कोरोनाबाधीत रुग्णांची हेळसांड असल्याने देशभरातील कोठेही कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

रुग्ण सेवा नाकारणार्‍यांचे परवाने रद्द करावेत
निवेदनाचा आशय असा की, रुग्णसेवा नाकारणार्‍या सर्व रुग्णालय व तेथील डॉक्टरांचे परवाने रद्द करावे , अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन राठोड यांच्याकडे केली आहे. याबद्दल मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनाही निवेदन पाठविले असल्याचे जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !