कोविशील्ड लसींचा जिल्ह्यात अधिक पुरवठा व्हावा : मुकेश गुंजाळ
भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लसींचा अधिक पुरवठा करावा, अशी मागणी, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी केली आहे. नागरीकांची शारीरिक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व कोरोनावर मात करण्यासाठी लस प्रभावशाली असल्यामुळे नागरीक मोठ्या संख्येने केंद्रावर गर्दी करीत लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे भुसावळ शहरात नागीकांची गैरसोय होत असल्याने लसींचे अधिकाधिक डोस उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.




