मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला
रावेर : मध्य प्रदेश-महाराष्ट्रच्या शेरी नाक्याच्या तपासणीत बॅरीगेट कट मारून गुरांना कोंबुन भरलेला ट्रक पाल मार्गे रावेरकडे येत असतांना रावेर पोलिसांनी कुसुंबा नजिक पकडला आहे. त्यात 30 ते 40 गुरे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या बाबत वृत्त असे की मध्य प्रदेश कडुन महाराष्ट्रात येत असतांना ट्रक क्र पीबी-11 सिएल 9302 शेरी नाका (पाल, ता.रावेर) येथे चेक करायला पोलिसांनी थांबण्याचा प्रयत्न केला असता चेक पोस्ट असलेले बॅरीगेटला कट मारून सुसाट रावेरच्या दिशेने येत होता. याची माहिती रावेर पोलिस स्टेशनला मिळताच पोलीस कर्मचारी यांनी कुसुंबानजिक नाकाबंदी करून ट्रक ताब्यात घेतला ट्रकला चेक केला असता ट्रकमध्ये सुमारे 30 ते 40 स गुरे कोंबुन भरले होते. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक ताब्यात घेऊन चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान ताब्यात असलेले गुरांना जळगाव येथील बाफना गो शाळा येथे पोलिस बंदोबस्तमध्ये रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक शितल कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांच्यासह रावेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केली .




