पुण्यासह गोरखपूर/दानापूर/ दरभंगा/भागलपूर दरम्यान पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या धावणार
भुसावळ : रेल्वेने पुणे आणि गोरखपूर/दानापूर/दरभंगा/ भागलपूर दरम्यान विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित विशेष गाड्या / अतिजलद विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे-गोरखपूर-पुणे विशेष गाडी (10 फेर्या)
01329 विशेष गाडी 11, 13, 15, 18, 20 मे रोजी (5 फेर्या) रोजी 8.30 वाजता पुणे येथून सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्या दिवशी 9 वाजता पोहोचेल. 01330 विशेष गाडी 13, 15, 17, 20 व 22 मे (5 फेर्या) रोजी गोरखपूर येथून 7 वाजता सुटेल व पुण्याला तिसर्या दिवशी 5.25 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.



पुणे-दानापूर-पुणे विशेष अतिजलद (6 फेर्या)
01331 विशेष गाडी पुणे येथून 10, 14, 17 मे (3 फेर्या) रोजी 10 वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसर्या दिवशी 6.45 वाजता पोहोचेल. 01332 विशेष गाडी 11, 15, 18 मे रोजी (3 फेर्या) रोजी दानापूर येथून 11.30 वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसर्या दिवशी 5.50 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-दरभंगा-पुणे विशेष गाडी (4 फेर्या)
01333 विशेष गाडी गुरुवार 13 व 20 मे रोजी (2 फेर्या) पुणे येथून सकाळी 10 वाजता सुटेल आणि दरभंगा येथे दुसर्या दिवशी 11 वाजता पोहोचेल. 01334 विशेष गाडी शनिवार, 15 व 22 मे रोजी (2 फेर्या) रोजी दरभंगा येथून 4.45 वाजता सुटेल आणि पुण्याला तिसर्या दिवशी 6.25 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
पुणे-भागलपूर- पुणे विशेष (2 फेर्या)
01335 विशेष गाडी पुणे येथून 16 मे 2021 रोजी (1 ट्रिप) सकाळी 10 वाजता सुटेल आणि भागलपूर येथे तिसर्या दिवशी 1.45 वाजता पोहोचेल. 01336 विशेष गाडी भागलपूर येथून 18 मे 2021 रोजी (1 फेरी) तीन वाजता सुटेल व पुण्याला तिसर्या दिवशी 6.25 वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जं., सासाराम, गया, किउल, जमालपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

