आरोग्य आढावा बैठकीत जि.प.सदस्यांनी घेतला आढावा


साकेगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी साकेगाव-कंडारी जिल्हा परीषद गटातील किन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र व साकेगाव-कंडारी उपआरोग्य केंद्राची सध्या असलेली रीस्थितीची माहिती घेतली व त्यासंबंधीत असलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच आरोग्यकेंद्र व उपकेंद्र येथे लागणार्‍या गरजेच्या साहित्यांची व अपुर्‍या असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांची उपलब्धता करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांच्याशी चर्चा केली. चिंताजनक परिस्थिती नसल्याने जिल्हा परीषद सदस्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी साकेगाव येथे डॉ.दीप्ती फेगडे, आरोग्य सहाय्यक सुरेश माळी,आरोग्य सेविका घुले, आशा सेविका तसेच कंडारी येथे पंचायत समिती सदस्य संतोष नाना निसाळकर, माजी उपसरपंच विशाल खेडेकर, आरोग्य सेवक आर.एस.तडवी, ए.ए.तडवी, आशा वर्कर उपस्थित होत्या. किन्ही येथे डॉ.कल्पना दवंगे, माजी सरपंच प्रदीप कोळी, सरपंच पती बंटी सोनवणेंसह सर्व आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होत्या. दरम्यान, कोरोना हॉटस्पॉट असलेल्या साकेगावसह इतर गावांनी बिकट परीस्थितीवर यशस्वीरीत्या मात केल्याबददल आरोग्य यंत्रणा व नागरीकांचे जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी आभार मानले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !