भुसावळता वीजदाब वाढल्याने वीज उपकरणे जळाली


महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल संताप

भुसावळ : महावितरणच्या विजतारांमध्ये बिघाड होऊन विजेच्या कमी अधिक दाब निर्माण झाल्याने गरुड प्लॉट भागातील तब्बल 12 ते 15 वीज ग्राहकांच्या घरातील उपकरणांचे नुकसान झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे वीजग्राहकांनी महावितरणच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. शहरातील नगरपालिका दवाखान्याजवळ महावितरणच्या वीज तार तुटल्याने फेज टू फेज होऊन गरुड प्लॉट, काशिनाथ लॉज भागात वीजेचा कमी अधिक दाब झाला. यामुळे या भागातील रहिवासी वीजग्राहक हरबतसिंग आनंदसिंग यांचा टिव्ही, फ्रीज, लाईट, सुनील पाटील यांचा टिव्ही व लाईट, शैलेश सुराणा यांच्या घरातील इन्हर्टर, लॅपटॉप, कॉम्युटर, रमेश चित्ताडकर यांच्या घरातील टिव्ही व लाइट, विलास इंगळे यांच्या घरातील लॅपटॉप व चार्जर, दिनकर कांबळे यांच्या घरातील फ्रीज, राजू भोळे यांचे वायफान राऊटर, लाईट, टिव्ही. किरण कोळंबे यांच्या घरातील पंखा, लाईट. राजू चंदन यांचे मेन स्विच व फ्यूज बॉक्स जळून निकामी झाले. यासोबतच अन्य ग्राहकांचेही सीएफएल दिवे फ्यूज झाले. या भागात महावितरणच्या कमी अधिक वीजदाबामुळे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे वीजग्राहकांच्या घरातील उपकरणांचे नुकसान वाढले आहे. महावितरण कंपनीकडे तक्रार केल्यानंतर कर्मचार्‍यांनी तुटलेली तार जोडून तब्बल तासभराने वीजपुरवठा सुरळीत केला.

 



 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !