रावेर प्रभारी विस्तार अधिकारी अधिकारीपदी हबीब तडवी
रावेर : रावेर पंचायत समितीच्या प्रभारी विस्तार अधिकारी म्हणून तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी हबीब तडवी यांना पुन्हा नियुक्ती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाच महिन्यांपूर्वीच तडवी यांची रावेरवरुन बदली झाली होती.
यावल पंचायत समितीत तडवींची नियुक्ती
सध्या यावल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी असलेले हबीब तडवी आता रावेरात सेवा बजावणार आहेत. त्यांची कायम नियुक्ती यावल पंचायत समितीत असून रावेर पंचायत समितीत ते आठवड्यातील तीन दिवस सेवा देणार आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांची पाच महिन्यांपूर्वीच रावेर शहरातून 12 वर्षानंतर बदली झाली होती. तडवी रावेरमध्ये 2008 मध्ये विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले होते तर शासनाने त्यांची बदली यावल पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी या पदावर नोहेंबर 2020 मध्ये केली आहे. एक तप ते रावेर पंचायत समितीमध्ये कार्यत होते. हबीब तडवी यांच्याबाबत जिल्हा परीषद प्रशासन एवढे मेहरबान का ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.



