रावेर पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची बदली


रावेर : रावेर पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांची भुसावळ पुरवठा शाखेत बदली करण्यात आली असून रात्री उशिरा याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढलेल्या आदेशात तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांना देण्यात आले आहे. चौकशी दरम्यान पुरवठा निरीक्षक पाटील यांना या ठिकाणी या पदावर ठेवणे योग्य नसल्याने पाटील यांची येथून बदली करण्यात आली.

या कारणावरुन झाली बदली
पुरवठा निरीक्षक पाटील यांनी अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री केली तसेच राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करून प्रति अर्ज तीन रुपयांप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री केल्याने त्यांची बदली करण्यात आली.



वरीष्ठांच्या विचार विनीमयानंतर निर्णय
शासनाने दिलेल्या फॉर्मबद्दल फेरबदल करणे , डीवन-ईडीवन जुळवणे त्यातून नव्याने यूनिट रजिस्ट्रर लिहिणे हा उद्दीष्ट होता. हे तालुक्यात गेल्या 15 वर्षापासून झाले नव्हते तसेच हमीपत्र नव्याने सादर करणे पात्र की अपात्र यासाठी आहे. शिक्याचा वापर यासाठी केला गेला की फॉर्मचा गैरवापर होऊ नये व फॉर्म तहसील कार्यालयातुनच गेले आहे. याची खात्री पटावी म्हणून केला आहे. हे सर्वेक्षण तालुक्यात राबवायचे होते. यामुळे वरीष्ठाशी विचार-विनिमय हा निर्णय घेण्यात आला असून माझ्या मनाने काहीच केले नसल्याचे पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !