24 तासात कोरोनामुळे 11 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात 849 रुग्ण आढळले
एकाच दिवसात 847 रुग्णांची कोरोनावर मात : आतापर्यंत 2374 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने 849 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 11 रुग्णांचा मूत्यू झाला. गत 24 तासात 847 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर आतापर्यंत 2374 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर 24 तासात 847 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 32 हजार 423 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील एक लाख 20 हजार 155 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



