मुंबई-गोरखपूर आणि पुणे-दानापूर दरम्यानच्या रेल्वेगाड्यांच्या सेवांचा विस्तार
भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष शुल्कासह पूर्णतः आरक्षित असलेल्या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विशेष रेल्वेगाड्यांच्या सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
01367/01368 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (2 फेर्या)
01367 विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 14 मे रोजी रात्री 9.45 ाजता सुटली असून गोरखपूर येथे तिसर्या दिवशी 8.10 वाजता पोहोचणार आहे. 01368 विशेष गोरखपूर ट्रेन येथून 16 मे रोजी 11.15 वाजता सुटल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 11.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, सतना, बांदा, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.



01495/01496 पुणे-दानापूर विशेष अतिजलद (4 फेर्या)
01495 पुणे-दानापूर विशेष अतिजलद ट्रेन पुणे येथून 15 मे व 19 मे रोजी (2 फेर्या) 5.40 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी 12.40 वाजता पोहोचेल. 01496 दानापूर विशेष अतिजलद ट्रेन दानापूर येथून 17 व 21 मे (2 फेर्या) 5 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी 11.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
01355/01356 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष (4 फेर्या)
01355 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष ट्रेनचा विस्तार होऊन मंगळवार 18 व 25 रोजी (2 फेर्या) चालविण्यात येणार आहे. 01356 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष सेवांचा विस्तार होऊन गुरुवार 20 व 27 मे (2 फेर्या) रोजी चालविण्यात येणार आहे.
01493/01494 पुणे-दानापूर विशेष अतिजलद (2 फेर्या)
01493 पुणे-दानापूर विशेष अतिजलद सेवेचा विस्तार होऊन 16 मे रोजी चालविण्यात येणार आहे. 01494 दानापूर-पुणे विशेष अतिजलद सेवेचा विस्तार होऊन 18 मे रोजी चालविण्यात येणार आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

