भुसावळ शहरात जुगाराचा डाव उधळला


भुसावळात बाजारपेठ पोलिस अ‍ॅक्टीव्ह मोडवर : कारवाईने जुगार्‍यांमध्ये खळबळ

भुसावळ : शहरातील नेब कॉलनी परीसरात जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव टाकत छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून जुगाराच्या साहित्यासह 24 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर पोलिसांना पाहताच अनेकांनी धूम ठोकली. बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार वाल्मीक सोनवणे यांच्यासह पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

या आरोपींना केली अटक
बाजारपेठ पोलिसांनी याप्रकरणी अतुल अशोक वाघ (पंचशील नगर), गणेश मुरलीधर महाजन (रा.आनंद नगर), जितेद्र अशोक लोहार (वांजोळा रोड, भुसावळ), प्रशांत पंडीत वारके (हनुमान नगर, भुसावळ), किरण राजेद्र फेगडे (गंगाराम प्लॉट, भुसावळ), तुषार सुलताने (आनंद नगर), गजानन देविदास पानजोग (इंदिरानगर) व नितीन सुरेश मोरे (नेब कॉलनी) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून 16 हजार 60 रुपये रोख रक्कम व मोबाईल मिळून सुमारे 24 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार वाल्मिक सोनवणे पुढील तपास करीत आहे. आरोपींनी नंतर जामिावर सुटक करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !