सामाजिक ऐक्यासह कोरोना नायनाटासाठी प्रार्थना


भुसावळात यंदा सामूहिक नमाजाचे घरातच पठण

भुसावळ : गतवर्षाप्रमाणेच कोरोना संकटामुळे यंदाही मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानाऐवजी घरातच रमजान ईदनिमित्त नमाज पठण करीत देशात सामाजिक ऐक्य नांदण्यासाठी कोरोनाचा नायनाट होण्यासाठी प्रार्थना केली. गतवर्षीदेखील मार्च महिन्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ईद साजरी झाली नाही तर यंदादेखील कोरोना संकट कायम असल्याने शुक्रवार, 14 रोजी मुस्लिम समाज बांधवांनी खडकारोडवरील ईदगाह मैदानाऐवजी घरातच ईदचे नमाज पठण केले. रमजान महिन्याच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी होती. शहरात ईदच्या पार्श्वभुमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. यंदा नातेवाईक किंवा मित्र परीवाराला भेटून गळाभेट करण्यापेक्षा समाजबांधवांनी मोबाईलवर संपर्क साधूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !