उटखेडा अवैधरीत्या गौणखनिजाची वारेमाप वाहतूक


रावेर : रावेर तालुक्यातील उटखेडा परीसरात परवान्याच्या नावाखाली रात्रंदिवस डंपरद्वारे मोठ्या प्रमाणावर मातीची वाहतूक सुरू आहे. या अवैधरीत्या सुरू असलेल्या माती वाहतुकीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. रावेर तालुक्यात सुकी , भोकर व तापी नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक केली जाते. महसूल विभागाने वाळू वाहतूक रोखण्यासाठी उपाय केले असले तरी माफिया प्रशासनाला जुमानत नाहीत. सध्या उटखेडा, भाटखेडा, सावखेडा, खिरोदा, चिनावल, निंभोरा , विवरा या परीसरात उटखेडा परीसरातून रात्रंदिवस डंपरद्वारे मातीची वाहतूक सुरू आहे. यासाठी खोदकाम व भराईसाठी जेसीबीचा वापर केला जातो . शासकीय नियमानुसार सूर्यास्तानंतर रात्री गौण खनिज वाहतूक करता येत नाही तरीही रात्री सर्रास मातीची वाहतूक होत आहे. डंपर चालक अधिक खेप व्हाव्यात म्हणून रस्त्यावर सुसाट पळतात यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !