रावेरात विनाकारण फिरणार्यांकडून दहा हजारांचा दंड वसुल
रावेर : रावेर शहरात ब्रेक द चेन अंतर्गत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजीपाला व फळ विक्रेते, विना मास्क फिरणारे व दुकानदार यांच्याकडून दहा हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तसेच आंबेडकर चौक येथे सोमवारी दुपारी 11 नंतर 270 विनाकारण फिरणार्यांच्या टेस्ट करण्यात आल्या. यावेळी नगरपालिका व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. रावेर शहरासह तालुक्यात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड, गांधी चौक परीसरात सकाळपासुन शुकशुकाट दिसून आला. मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी स्वतः रस्त्यावर फिरून कारवाईचा आढावा घेतला.




